कोल्हापूरला पावसाने झोडपले

July 17, 2011 10:56 AM0 commentsViews:

17 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 956 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 209 मिमी. इतका झाला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीबरोबर इतरही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेेले आहे. जवळपासच्या अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

close