बनावट दस्तावेज करणारी टोळी गजाआड

July 16, 2011 4:41 PM0 commentsViews: 6

16 जुलै

उल्हासनगर गुन्हेअन्वेषण विभागाने शासकीय बनावट दस्तावेज तयार करणार्‍या 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळी कडून बनावट पॅनकार्ड, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र, तसेच अनके सरकारी दस्तावेज असा पन्नास हजार रुपये किमतीची कागदपत्र त्याच बरोबर ही बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारे संगणक, स्कॅनर, प्रिन्टर, असं 45 हजार रुपयांचे साहित्य जप्त करणात आले आहे. या टोळीने सदर दस्तावेज विकून 3 – 4 महिन्यात एक लाख पेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. अशा प्रकारे या टोळीने किती बनावट दस्तावेज कोणाकोणाला विकले आहेत याची चौकशी पोलीस करत आहे.

close