नोकरीचे बनावट आदेश देणार्‍या भामट्याला चोप

July 17, 2011 11:09 AM0 commentsViews:

17 जुलै

नोकरीचे बनावट आदेश देणार्‍या भामट्याला शिवसेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. हिंगोलीमधील सेनगाव इथं पुजाजी खंदारे याने गरजूंना सरकारी नोकरीचे बनावट आदेश देऊन 10 लाख 64 हजार रुपये उकळले.

खंदारे या आदेशांवर राजमुद्राही लावायचा त्यामुळे गरजूंना हे आदेश खरे वाटायचे. नोकरीचा आदेश जेव्हा लोक कार्यालयात घेऊन आले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं. खंदारेला संपर्क साधल्यावर तो गायब झाला. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांना कळल्यावर त्यांनी खंदारेला शोधून भर रस्त्यात मारहाण करत धिंड काढत पोलिसांच्या हवाली केलं.

close