बॉम्बस्फोट हे सिस्टिमचे अपयश – कामत

July 16, 2011 5:47 PM0 commentsViews: 2

16 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप करून काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांनी काँग्रेसला घरचा आहेर केला आहे. नुकताच केंद्रात झालेला मंत्रिमंडळाचा विस्तारावर नाराज झालेल्या गुरूदास कामत यांनी राजीनामा दिला. यानंतर ही नाराज कामत काही दिवस पडद्याआड होते. आज एकाकी कामत यांनी मीडियासमोर येऊन सरकारवर यंत्रणेच्या अपयशाचं खापर फोडलं.

केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला मनासारखे पद मिळाले नाही म्हणून कामत यांनी नाराज होऊन शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. काँग्रेस हायकमांडने कामत यांना समज वजा इशारा देऊन ही कामत यांनी हायकमांडच्या आदेशाकडे पाठ फिरवली. परिणामी कामत यांनी राजीनामा देण्यास भाग पडावे लागले. मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, विरोधी पक्षांना घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपुस केली.

त्यापाठोपाठ आज मुंबई काँग्रेसचे खासदार गुरूदास कामत यांनी मीडियासमोर येऊन स्फोटांबद्दल प्रतिक्रिया दिली. मुंबईत या आधी घडलेल्या घटनांपासून आपण काहीही धडा घेतलेला नाही त्यामुळे बाँबस्फोटासारख्या घटना वारंवार घडतात. या सर्व घटनांना सरकारची यंत्रणाच जबाबदार आहे. आज पर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काही शिकायला पाहिजे होते. मात्र तसे काही होऊ शकले नाही. साखळी स्फोटांनंतर पंतप्रधानांना मी ताबडतोब पत्र लिहून 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून दिली. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणीही केली. या उपाय योजना तर होतील पण या बॉम्बस्फोटांना हे या सिस्टिमचे अपयश आहे अशी टीकाही कामत यांनी केली.

close