कॅश फॉर व्होट प्रकरणात पहिली अटक

July 17, 2011 4:25 PM0 commentsViews: 2

17 जुलै

कॅश फॉर वोट प्रकरणी आज पहिली अटक करण्यात आली आहे. संजीव सक्सेना यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. सक्सेना हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमर सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर दोनच दिवसात दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. 2008 साली युपीए सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी काही खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा सक्सेना यांच्यावर आरोप आहे.

close