26/11 चा सुत्रधार इलियास काश्मिरी जिवंत !

July 16, 2011 6:02 PM0 commentsViews: 4

16 जुलै

हुजी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या इलियास काश्मिरी हा जिवंत असल्याची बातमी पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिली. तो अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमाभागात सक्रिय असल्याची माहितीही वृत्तपत्रात देण्यात आली. इलियास काश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त जवळपास महिनाभरापूर्वी प्रसिध्द झालं होतं.

पण अमेरिका किंवा पाकिस्तान यापैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. यापूर्वीही इलियास ठार झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. इलियास हाच मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं म्हंटलं जातं.

close