आसाममध्ये पुराचा थैमान

July 17, 2011 4:56 PM0 commentsViews: 3

17 जुलै

आसाममध्ये पुराने थैमान घातला आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराचा आसामच्या चार जिल्ह्यांना फटका बसला आहे. धेमाजी, जोरहाट, लखीमपूर, सोनीतपूर या जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. सुमारे 140 गावं या पुरात बुडाली आहे. या पुराचा फटका सुमारे दीड लाख लोकांना बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाचे जवान सध्या आसाममध्ये मदतकार्य करत आहे.

close