कोकणात पावसाचा कहर ; 70 गावांचा संपर्क तुटला

July 18, 2011 10:10 AM0 commentsViews: 4

18 जुलै

कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाचे तांडव सुरूच आहे. रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील गावांना जगबुडी नदीच्या पुराचा वेढा बसला आहे. खेड शहरात पाणी भरलं असून चोरद नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे 70 गावांचा संपर्क तुटला आहे. खेड तालुक्यातील अलसुरे मोहल्ला गावाला पाण्याने पूर्णपणे वेढलं आहे. त्यामुळे येथील 500 गावकरी अडकले आहेत. यातल्या काहींनी मशीदीचा तर काहींनी गच्चीचा आसरा घेतलेला आहे.

काल रविवारी तळगावजवळ ट्रॅकवर दरड कोसळल्याने ठप्प झालेली कोकण रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येत असताना आता पोमेंडीजवळ ट्रॅकवर माती आली. त्यामुळे पुन्हा कोकण रेल्वे विस्कळीत झाली. चिपळूण कामठे घाटाजवळच्या रुळांवर माती आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. 8 जेसीबींच्या मदतीने पोमेंडीला माती बाजूला काढण्याचे काम सुरु झालं आहे. त्यामुळे मुंबई ते रत्नागीरी वाहतुक सुरळीत आहे. मुंबई गोवा महामार्गही बंद झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातीव बेल नदीला पुर आल्यामुळे कसाल ते कुडाळ दरम्यान मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याने गाड्या रद्द

- 12133/12134 सीएसटी मडगाव एक्सप्रेस रद्द- 12619/12620 एलटीटी – मेंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस रद्द – 12051 / 12052 सीएसटी – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द – 10103/10104 सीएसटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस रद्द – 11003/11004 दादर – सावंतवाडी राज्य राणी एक्सप्रेस रद्द

close