कोकणाला पावसाचा तडाखा ; रेल्वेमार्गावर दरड कोसळली

July 17, 2011 4:08 PM0 commentsViews: 6

17 जुलै

कोकणात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर खूप असल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तर चिपळुणच्या वशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांना चिपळूण नगरपालिकेकडून धोक्याचा इशारा देण्यात आला.

तर संगमेश्वर शहरातल्या बाजारपेठेतही पाणी भरले आहे. मुंबईकडून कोकणाकडे जाणार्‍या गाड्या रत्नागिरीजवळ थांबवण्यात आल्यात तर दक्षिणेकडून येणार्‍या गाड्या कणकवलीजवळ थांबवण्यात आल्यात. मात्र अजुनही एस टी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आलेली नाही.

रेल्वेमार्गावर दरड कोसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळगावजवळ कोकण रेल्वेमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे कोकण रेल्वे मध्यरात्रीपासून पुन्हा ठप्प झाली आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे तळगावजवळ रेल्वेट्रकवर माती यायला सुरूवात झाली होती. आणि नंतर ही दरड कोसळली. कोकण रेल्वेकडून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आलं आहेत. पण माती हटवण्यास आणखी 3 ते 4 तास लागणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर पोमेंडीजवळ संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. भिंत केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होतेय. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल साठला आहे. पहिल्या पावसातच याच ठिकाणी रेल्वे ट्रकवर भिंत कोसळली होती.

close