इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधीत संशयित ताब्यात

July 18, 2011 10:33 AM0 commentsViews: 8

18 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या 3 बॉम्बस्फोटाचे धागेदोरे आता मिळू लागले आहे. स्फोटांचे धागदोरे आता कोलकाता पर्यंत जाऊन पोहचले आहे. एटीएस आणि कोलकत्ता एसटीएफने शहरात शोध घेत होते. अखेर त्यांच्या तपासाला यश आलं आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या एका संशयित हस्तकाला ताब्यात घेतलं आहे. हरुन असं त्याचं नाव आहे. गुजरात पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान काल मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी पोलिसांनी फैज उस्मानी या संशयिताला ताब्यात घेतलं होतं. फैजला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला. संशयित फैज उस्मानी याचा मृत्यूचा तपास आता सीआयडीला सोपवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे.

close