प्रसाद पुरोहितचा छळ केल्याचा आरोप

November 13, 2008 3:27 PM0 commentsViews: 7

13 नोव्हेंबरमालेगाव बॉम्बस्फोटातला दुसरा आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याचा एटीएसच्या कोठडीत छळ केला जात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यासंदर्भात चौकशी करण्याचा एक अर्जही त्यांनी नाशिकच्या कोर्टात सादर केला आहे. एटीएसच्या कोठडीत प्रसाद पुरोहितला अमानुष पद्धतीनं मारहाण केली जात असल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्याच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झालीयेत. तर दोन्ही हात आणि गुडघ्यांना बर्‍याच जखमा झाल्यात, असं त्या अर्जात म्हटलंय. त्यावर पंधरा नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारला त्याबाबतची माहिती देण्याचे आदेश दिल आहेत. ही तक्रार पुरोहितचे नातलग विलास दळवी यांनी केलीय. सिव्हील सर्जन, दोन सीनियर डॉक्टर्स आणि दोन आर्मी ऑफीसर्स यांच्या उपस्थितीत पुरोहितांची मेडीकल चाचणी करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

close