जे. डे हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच

July 18, 2011 10:46 AM0 commentsViews: 1

19 जुलै

जे.डे. हत्येप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका व्ही. पी. पाटील यांनी दाखल केली होती. हायकोर्टाने आज ही याचिका फेटाळत जोतिर्मय डे हत्याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच कायम ठेवला आहे. 11 जूनला मुंबईतल्या पवईमध्ये मिड -डे चे क्राईम एडिटर जे. डे यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी छोटा राजन गँगच्या सात जणांना अटक करण्यात आली आहे.

हे सर्व छोटा राजन गँगचे महत्वाचे गुंड आहेत. या सात जणांत सतीश कालिया हा शूटर आहे. याने प्रत्यक्षात जे.डे यांच्या गोळ्या झाडल्या आहेत. सतीश काल्या,अनिल वाघमोडे, अरुण ढोके, सचिन गायकवाड, मंगेश अगनवे, निलेश शेंडगे आणि अभिजीत शिंदे अशी या सात जणांची नावं आहे. त्याचप्रमाणे याच प्रकरणात विनोद चेंबूर यालाअटक करण्यात आली.

close