बॉम्बस्फोटांची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी – व्ही. पी. पाटील

July 18, 2011 12:45 PM0 commentsViews: 3

19 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी या मागणीसाठी हायकोर्टाचे ज्येष्ठ वकिल व्ही. पी. पाटील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. क्राईम ब्रँचच्या कोठडीत या ब्लास्टच्या संशयिताचा मृत्यू झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच हा देशावरचा हल्ला असून या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. म्हणून याचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी व्ही.पी.पाटील यांनी केली.

काल रविवारी बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी फैज उस्मानी या संशयिताला ताब्यात घेतलं होतं. फैजला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला. संशयित फैज उस्मानी याचा मृत्यूचा तपास आता सीआयडीला सोपवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे. या घटनेनंतर आज व्ही.पी.पाटील यांनी बॉम्बस्फोटांची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केली. तसेच यासाठी त्यांनी हायकोर्टात एक जनहित याचिका ही दाखल केली.

close