मनसे नगरसेवकाला मारहाण प्रकरणी अटक

July 18, 2011 12:53 PM0 commentsViews: 4

18 जुलै

डोंबिवलीच्या मनसेचे नगरसेवक माणिक म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. म्हात्रे आणि त्यांच्या सोबत असणार्‍या सहा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये तरुणांना मारहाण करुन त्यांना लुटल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बदलापूरच्या एरंगाळ परिसरात त्यांनी तरुणांना मारहाण केली होती.

तरुणांकडून माणिक म्हात्रे यांनी सोन्याची चैनही लुटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पीडित तरुणांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी माणिक म्हात्रे यांना अटक केली. म्हात्रेंसोबत त्यांच्या 6 साथीदारांनाही अटक करण्यात आली. म्हात्रेंसहित सातही जणांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

close