पुण्यात आयुक्तांच्या बदलीमागे राष्ट्रवादीचा दावा फोल

July 18, 2011 1:03 PM0 commentsViews: 4

18 जुलै

पुणे महापालिकेचे माजी आयुक्त महेश झगडे यांच्यावरुन पुण्यात पुन्हा राजकीय वाद पुन्हा रंगणार असं दिसतं आहे. झगडेंच्या बदलीची आपणच मागणी केल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे महेश झगडे यांच्या बदलीमागे काहीही राजकारण नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा फोल ठरला.

तर दुसरीकडे ट्रेनिंग संपून एक महिना झाला तरी झगडेंना अजूनही पोस्टिंग देण्यात आलेली नाही. अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडणार्‍या आयुक्त महेश झगडेंना एप्रिलमध्ये मसुरीला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं . आणि त्यापाठोपाठ पुणे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त हवा असा आव आणत महेश पाठक यांना पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर झगडेंची बदली करण्यात आली. याप्रकरणात विरोधकांनी आवाज उठवल्यावर झगडेंची बदली हा प्रशासनाचा भाग असून त्यामागे कोणतंही राजकारण नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

close