भोपाळच्या विषारी कचर्‍याला विरोध

July 18, 2011 1:54 PM0 commentsViews: 3

18 जुलै

भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतला विषारी कचरा नागपूरच्या डीआरडीओच्या भट्टीत जाळण्याचा आदेश जबलपूर हायकोर्टाने दिला आहे. याविरोधात आता नागपूरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहे. आज युथ फोर्स संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आणि हा विषारी कचरा नागपुरात आणण्याच्या निर्णयाला विरोध केला.

भोपाळच्या युनियन कार्बाईड कंपनीतला विषारी रासायनिक कचरा नागपूर जवळ असलेल्या बुटी बोरीमधील डिफेंन्सच्या डीआरडीओमध्ये आणून विल्हेवाट करण्याचा निर्णय मध्य प्रदेशच्या जबलपूर हायकोर्टान दिला आहेत. येत्या दहा दिवसात हा सर्व कचरा नागपूरकडे हलवण्याचा या निर्णयात उल्लेख आहे.

या टॉक्सिक वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात डायऑक्सिन हा विषारी पदार्थ आहे. त्यामुळे निघणारा धूर 30 किलोमीटर पर्यंत पसरू शकतो या धूरा मुळे मेंदू वर परिणाम होवून येणार्‍या पिढीवर याचा परिणाम होऊ शकतो अस तंज्ज्ञांचे मत आहे. 4 डिसेंबर 1984 मध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात वायुगळतीने हजारो लोक मारले गेले आणि या वायुगळतीचे परिणाम तिसर्‍या पिढीलाही भोगावे लागत आहे.

close