आंदोलनाच्या सुरक्षेसाठी अण्णा हजारे कोर्टात जाणार

July 18, 2011 1:13 PM0 commentsViews: 2

18 जुलै

लोकपालासाठी 16 ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन दडपले जावू नये यासाठी अण्णा हजारे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. बाबा रामदेव यांचं आदोलन दडपले तसेच ऑगस्टमधील आंदोलन दडपल्यास कोर्टाने हस्तक्षेप करावा अशी विनंतीही न्यायालयाला करणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केलं. बाबा रामदेव यांच्यासारखीच तुमची स्थिती करू अशी धमकी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अण्णांना दिली होती. त्यामुळेच ही खबरदारी घेणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितले.

close