गोव्याच्या मराठी सिनेमाची अमेरिकावारी

November 13, 2008 3:46 PM0 commentsViews: 16

13 नोव्हेंबर, गोवा तुलसीदास चारी 'मरेपर्यंत फाशी' हा गोव्याचा मराठी सिनेमा अमेरिकेत जात आहे. फाशीच्या शिक्षेवर भाष्य करणारा हा सिनेमा अमेरिकन फिल्म फेस्टिवलमध्ये हा पाहता येणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्या डॉ. प्रमोद साळगावकर आणि ज्योती कुंकळेकर खूश आहेत. डॉ. प्रमोद साळगावकर आणि ज्योती कुंकळेकर यांची निर्मिती असलेल्या 'मरेपर्यंत फाशी'नं गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पॅनोरमातही स्थान माळालं होतं. आता या सिनेमाला अमेरिकेच्या गोल्डन गेट फिक्शन आणि डॉक्युमेंटरी फेस्टिवलमध्ये स्थान मिळालं आहे. "फाशी हवी की नकोय यावर हा सिनेमा भाष्य करतो. सिनेमात किशोर कदम, वर्षा उसगांवकर, प्रभाकर पणशीकर, अशोक समर्थ असे कलाकार आहेत. प्रत्येकाने चांगली कामं केली आहेत. सिनेमा तयार करताना आम्ही दोघींनी जराही तडजोड केलेली नाही आहे. आणि त्याची पावती आम्हाला मिळाली आहे," अशी माहिती सिनेमाच्या निर्मात्या ज्योती कुंकाळकर यांनी दिली. सिनेमाचं शुटींग गोव्याच्या तुरुंगात झालं आहे. चंद्रकांत बर्वे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आता गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल होत आहे. त्यामुळे सिनेमाचा प्रिमियर गोव्यातच फिल्म फेस्टिवल दरम्यान करायचा विचार असल्याचं निर्मात्या ज्योती कुंकळेकर म्हणाल्या.

close