युपीत गुन्हेगाराची पाळंमुळं – राज ठाकरे

July 18, 2011 3:20 PM0 commentsViews: 2

18 जुलै

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांना आणि देशभरात होत असलेल्या बॉम्बस्फोटांना उत्तरप्रदेश, बिहार मधील येणार्‍या लोंढ्यासोबत येणार्‍या गुन्हेगारी वर्ग यासाठी जबाबदार आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला. तसेच आपण केल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. असा खुलासा राज ठाकरे यांनी केला.

मुंबई स्फोटानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाच्या लोंढ्यावर खापर फोडलं होतं. यावर खुलासा देताना राज ठाकरे यांनाी कृष्णकुंजवर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या विधानाचा काही लोकांना समजला नाही. त्यांचा चुकीचा अर्थ काढला गेला. असा आरोप नाव घेता राज ठाकरे यांनी केला.

यानंतर आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देत राज यांनी परप्रांतीयांच्या विषयात हात घातला.उत्तरप्रदेश आणि बिहारमधील आजमगढ येथे असलेल्या एक मोठ आयएसआयचं केंद्र जे पकडले गेले. अशा वातावरणामुळे परप्रांतीयांच्या सोबत येणारे गुन्हेगार हे स्फोटांना जबाबदार आहे. काल जो संशयित फैज उस्मानी यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ साबरमती कारागृहात आहे. फैज हा त्याला भेटायला जायचा. त्यांचा मृत्यू उच्चरक्त दाबाने झाला. त्याची चौकशी पोलिसांनी करू नये का असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

close