पेडर रोड फ्लायओव्हरच्या जनसुनावणीत नागरिकांमध्ये फूट

July 18, 2011 4:13 PM0 commentsViews: 4

18 जुलै

मुंबईतील पेडर रोड फ्लायओव्हरची जनसुनावणी काही नागरिकांनी उधळून लावली. जिल्हाधिकार्‍यांनी ही जनसुनावणी आयोजित केली होती. काही उच्चभ्रू नागरिकांनी या प्रस्तावाला नकार दिला. पण मध्यमवर्गीय नागरिकांचा मात्र सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यावरुनच जनसुनावणीदरम्यान नागरिकांमध्ये वाद झाला. आणि काही नागरिकांनी इथं हुल्लडबाजी केली. पेडर रोडच्या साडेचार किमीच्या फ्लायओव्हर संदर्भात चर्चेच आयोजन करण्यात आलं होतं. हाजीअली येथील हॉलमध्ये ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

close