मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले

July 18, 2011 4:17 PM0 commentsViews: 3

18 जुलै

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल जुलै महिना मध्यावर येऊन ही रखडले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात संपलेल्या परीक्षांचे निकाल मात्र अजूनही लागलेले नाहीत. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी- कम्प्युटर सायन्स, बीएस्सी- आयटी, बीएमएम, एमए च्या विद्यार्थ्यांना रिझल्टसाठी ताटकळावे लागतं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. तर व्होकेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेणार्‍या विद्यार्थ्यांपुढेही निकाल नसल्यामुळे प्रश्नचिन्ह आहे.

close