मुंबईतील धरण तुडुंब

July 19, 2011 9:57 AM0 commentsViews: 9

19 जुलै

मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत आहे पण मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला. तुळशी तलाव भरुन वाहू लागला आहे.

येत्या चोवीस तासात मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 23. 7 मिमी, पूर्व उपनगर – 29 मिमी, पश्चिम उपनगर – 16.6 मिमी , कुलाबा – 24.9 मिमी, सांताक्रुझ -41.2 मिमी पावसाची नोंद पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईपेक्षा मंुबईच्या मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.

मुंबईतला पाणी साठा

धरणाची जलस्थिती क्षमता (मी) पातळीमोडक सागर 163.15 160.51 तानसा 128.63 122. 62विहार 80.12 77.27तुलसी 139.17 139.22 अप्पर वैतरणा 603.51 598.09भातसा 142.07 121.10 तर दुसरीकडे पुण्यातील खडकवासला धरण आता 83 टक्के भरलंय. आणि यामुळे या धरणातून पाणी सोडायला आता सुरुवात झाली. सध्या धरणातून 12 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

close