कोल्हापुरात पावसाची संततधार कायम

July 19, 2011 10:09 AM0 commentsViews: 5

19 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. पंचगंगेची राजारामबंधार्‍यावरील पाण्याची पातळी 39.8 इतकी झाली. धोका पातळी 43 फुट इतकी आहे. इतर नद्यांनाही पुर आला. त्यामुळे 73 बंधार्‍यावर पाणी आलं आहेत. यामुळे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

राधानगरी धरण 95 टक्के भरलं असून कोणत्याही क्षणी स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर रत्नगिरी मार्गावर बांबवडेजवळ झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता हे रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला करण्यात आलं आहे. त्यामुळे ठप्प झालेली वाहतूक आता पूर्ववत करण्यात आली.

close