स्फोटातील मृतांची संख्या 20 ; ऑपेरा हाऊस येथे 65 हिरे सापडले

July 19, 2011 10:15 AM0 commentsViews: 2

19 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता वाढली आहे. मुंबई बॉम्बस्फोटील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सिरियल बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा हा आता 20 वर जाऊन पोहोचला आहे. झवेरी बाजार बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या अशोक भाटे यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

दरम्यान ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी आता 65 हिरे सापडले आहेत. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हे हिरे ताब्यातघेतलेत. या हिर्‍यांची किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. स्फोट झाला त्या ठिकाणाची साफसफाई करताना सफाई कामगारांना हे हिरे सापडले आहे.

close