‘सीसीटीव्ही’च्या मुद्यावरून राष्ट्रवादीत ‘गृह’ कलह

July 19, 2011 10:47 AM0 commentsViews: 8

19 जुलै

मी गृहमंत्री असतानाच मुंबईत सीसीटीव्ही बसवण्याबद्दल पूर्ण उपाययोजना करण्यात आली होती. त्याविषयी संपूर्ण आराखडा तयार झाला होता. याबद्दल लवकरात लवकर पावलं उचलणं आवश्यक आहे,असं मत माजी गृहमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

मुंबईवरचे दहशतवादी हल्ले थांबवायचे असतील तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबद्दल लवकर निर्णय घ्यायला हवा असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आर.आर.पाटील यांना लगावला. कॅमेरे बसवण्याचं काम का झालं नाही ते आर.आर.पाटील यांनाच विचारा असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गृहखात्यावर नाराज आहेत. यासंदर्भात त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मुंबई फर्स्ट या एनजीओकडून मुंबईमध्ये 5 हजार सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रस्तावाचे प्रेझेंटेशन केले जाणार आहे.

close