काश्मीरमध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यात झटापट

November 13, 2008 4:23 PM0 commentsViews: 4

13 नोव्हेंबर, काश्मीरकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या गाड्यांच्या ताफ्यात घुसून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. यावेळी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी झटापटही झाली. तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. हा प्रकार गंडेरबाल जिल्ह्यातल्या बरसू गावाजवळ घडला.

close