‘विजयी सिक्सर’ मारणार्‍या धोणीच्या बॅटचा लिलाव

July 18, 2011 5:41 PM0 commentsViews: 3

18 जुलै

भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने वर्ल्डकप फायनलमध्ये विजयी सिक्सर मारलेल्या बॅटचा लिलाव होणार आहे. लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या एका कार्यक्रमात धोणी आपल्या बॅटचा लिलाव करणार आहे. लिलावातून मिळालेेली रक्कम धोणीची पत्नी साक्षी हिच्या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे. या लिलावात धोणीच्या आणखीन काही वस्तूंचा लिलाव होईल. तसेच वर्ल्डकप फायनलमध्ये वापरण्यात आलेल्या बॉलचाही लिलाव होणार आहे. या बॉलवर श्रीलंकन बॉलर मुथ्थैय्या मुरलीधरननं सही केली आहे.

close