पुणे मध्यवती बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

July 19, 2011 9:42 AM0 commentsViews: 21

19 जुलै

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. यात 139 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे जिल्हा बँकेच्या काही अधिकारी, कर्मचारी आणि सोसायटीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा यात समावेश आहे. काल रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

सहकार खात्याच्या लेखा परीक्षकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहे. 2007 ते 2010 या 3 वर्षांत तब्बल 43 कोटी रुपयांचा हा घोटाळा बोगस कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला होता. दरम्यान आता संचालकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार विजय शिवथरे यांनी केली.

close