भोपाळमधील विषारी कचर्‍याला राष्ट्रवादीचा विरोध

July 19, 2011 10:47 AM0 commentsViews: 1

19 जुलै

भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतील विषारी कचरा नागपूरच्या डीआरडीओ भट्टीत जाळण्याच्या आदेशाविरोधात आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भाजप, मनसे पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही विरोध केला आहे. याविरोधात नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शन करण्यात आली. या विषारी कचर्‍यामुळे नागपूरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कचरा नागपुरात जाळू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

close