धिंगाणा घालण्यार्‍या मद्यपींना गावकर्‍यांनी चोपले

July 19, 2011 10:58 AM0 commentsViews: 20

19 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी धबधब्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणार्‍या पर्यटकांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. राधानगरी शहरापासून पाच किलोमीटरवर असणार्‍या राऊतवाडी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येतात. पण यामध्ये मद्यपी पर्यटकांची संख्या जास्त असते.

आज काही मद्यपी पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी दारु पिऊन धिंगाना घालत होते. त्याचबरोबर महिला पर्यटकांसोबत उद्धट वर्तन करत होते. त्यामुळे राऊतवाडी ग्रामस्थांनी अशा पर्यटकांना चांगलीच अद्दल घडविली. ग्रामस्थांनी या मद्यपी तरुणांना चांगला चोप देवुन पोलिसांच्या हवाली केलं.

close