धोणीच्या बॅटला 72 लाखांची बोली

July 19, 2011 12:55 PM0 commentsViews: 1

19 जुलै

भारतीय टीमचा कॅप्टन एम.एस.धोणीने वर्ल्डकप फायनलमध्ये विजयी सिक्सर मारलेल्या बॅटचा लिलाव काल सोमवारी लंडनमध्ये झाला. आणि या बॅटला एक लाख पाऊंड म्हणजे भारतीय रक्कम 72 लाख एवढी घसघशीत किंमत मिळाली. ही बोली कोणी लावली ते मात्र अजून कळू शकले नाही.

काल लंडनमध्ये बॅटचा लिलाव झाला तेव्हा सिद्धार्थ माल्या तसेच सहारा ग्रुपचे अभिजीत सरकार उपस्थित होते. धोणीची पत्नी साक्षीने सुरु केलेल्या फाऊंडेशनसाठी या बॅटचा लिलाव झाला. त्यामुळे भारतातल्या गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा वापरण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इतरही काही वस्तूंचा लिलाव झाला. वर्ल्ड कप फायनल दरम्यान वापरलेला बॉलही यात होता. बॉलवर मुथय्या मुरलीधरनची सही आहे.

close