खान्देशात अस्मानी संकटाबरोबर शेतकर्‍यांची बियाणात फसवणूक

July 19, 2011 1:02 PM0 commentsViews: 4

19 जुलै

राज्यातील अनेक भागात जरी पावसाने जोरदार हजेरी दिली असली तरी खान्देश मात्र अजूनही तहानलेलाच आहे.आणि यात भर म्हणजे बोगस बियाणं. बियाणांची पेरणी केल्यानंतर 20 दिवस उलटले तरी कोंब न फुटल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. निर्मल सीड्स या कंपनीच्या बियाणांची तपासणी आता कृषी विभागाने सुरु केली आहे.

अमळनेर तालुक्यातल्या जळोद गावात अल्पभूधारक शेतकरी पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या अवघ्या 4 एकर शेतीत निर्मल सीड्स या प्रसिद्ध कंपनीचे बियाणे पेरले. मात्र 15 दिवस झाले तरी कोंब फुटला नाही. बियाणं चांगलं असलं तर अवघ्या 8 दिवसात याचा फुलोरा तयार होतो.

निर्मल सीड्स या कंपनीची बियाणं घेतलेल्या अनेक शेतकर्‍यांची हिच परिस्थिती आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीची कृषी विभागाने दखल घेऊन पंचनामाही केला. ग्राहक मंच शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देईल असं सांगणार्‍या कृषी अधिकार्‍यांनी मात्र बियाणं विक्रेत्या कंपनी विरुध्द कारवाई करायला मात्र नकार दिला.

close