रत्नागिरीत पूर परिस्थिती हताळण्यात प्रशासन अपयशी !

July 19, 2011 1:32 PM0 commentsViews: 4

19 जुलै

रत्नागिरी जिल्ह्याची पूर परिस्थिती हताळण्यात जिल्हाप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप रहिवासी करत आहे. काल दिवसभर पाण्याखाली असणार्‍या अलतुरे या खेड मधल्या गावाचा जिल्हाधिकार्‍याने पूर ओसरल्यावर दौरा केला. दौर्‍याच्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर थांबण्यास सांगितलं.

वरातीमागून घोडे पध्दतीच्या या प्रकारामुळे हलतुरे पूरग्रस्त प्रशासनावर संतप्त आहेत. पूर भरलेला असताना बोटीच्या सहाय्याने कोणीही प्रशासनाचा अधिकारी आमच्या गावात आला नाही उलट आम्हीच या अधिकार्‍यांपर्यंत पूरस्थितीची माहिती पोहचवली असं येथील खुद्द पोलीस पाटलांच म्हणणं आहे.

close