जे.डे हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

July 19, 2011 1:42 PM0 commentsViews: 1

19 जुलै

ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दीपक सिसोदिया असं त्याचं नाव आहे. जे. डे हत्या प्रकरणात अटक झालेला तो नववा व्यक्ती आहे.जे.डे हत्या प्रकरणात यापूर्वीच छोटा राजन गँगच्या सात जणांना अटक करण्यात आली आहे.

डे यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सतिश काल्या हा अटकेत आहे. डे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारं नैनितालमधून आणण्यात आली होती. दिपक सिसोदिया या इसमाने ही हत्यारे काल्या याला पुरवली होती. याच सिसोदियाला क्राईम ब्रांचने नैनिताल इथून अटक केली. आज रात्री त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.

close