औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांमध्ये झटापट

July 19, 2011 2:01 PM0 commentsViews: 1

19 जुलै

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पार्किंगच्या जागा बिल्डरांनी वापरल्याच्या मुद्द्यावरुन नगरसेवकांमध्ये झटापट झाली. पार्किंगच्या मुद्दयावर चर्चा सुरू असताना नगरसेवकचं बिल्डरांना पाठिशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक नासिर खान यांनी केला.

हा आरोप करताना त्यांनी थेट भाजपचे नगरसेवक संजय जोशी यांचे नाव घेतले. त्यामुळे ही झटापट झाली. महापालिकेने पार्किंगच्या जागा बळकावणार्‍या बिल्डरांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. पण या कारवाईत नगरसेवकचे अडथळे आणत असल्याचा आरोप नगरसेवक नासीर खान यांनी केला त्यामुळे भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. आणि सभेत गोंधळाला सुरूवात झाली.

close