मुंबई विद्यापीठाचे आज होणार निकाल जाहीर

July 19, 2011 2:57 PM0 commentsViews: 6

19 जुलै

मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांचे रिझल्ट्स अखेर आज जाहीर करण्यात येणार आहे. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचं प्रशासन जागं झालं. अगदी तातडीने म्हणजेच आज रात्री दहा वाजता बी.कॉमचा रिझल्ट नेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिवाय उद्या बी.एस.सी काम्प्युटर सायन्स आणि लॉच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बी.ए. चा निकाल मात्र 30 जुलैच्या दरम्यान लागेल त्यानंतर 31 जुलैच्या पुढे एम. ए. चा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक विलास शिंदे यांनी आयबीएन लोकमतला दिली.

हे सर्व निकाल आधी मुंबई विद्यापीठाच्या आणि एमकेसीएलच्या वेबसाईट्सवर पाहता येणार आहेत. दरम्यान निकालांची तारीख जाहीर होत नव्हती म्हणून भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज कलिना विद्यापीठाच्या आवारात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी परिक्षा नियंत्रकांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निवेदनही दिलं.

हे सर्व निकाल आधी मुंबई विद्यापीठाच्या आणि एमकेसीएलच्या वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

- www.mu.ac.in

close