नितीशकुमार यांचाही ‘आदर्श’ घोटाळा ?

July 19, 2011 5:26 PM0 commentsViews: 6

19 जुलै

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या स्वच्छ प्रतिमेला पहिला धक्का बसला आहे. पाटण्यातली मोक्याच्या ठिकाणची जमीन मंत्र्याच्या आणि उच्च सरकारी अधिकार्‍यांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप नितीशकुमार यांच्यावर होत आहे. आयबीएन-7 नं हा घोटाळा उघडकीला आला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार अडचणीत आलेत.

बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या मुलीला बिहार इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची 87 हजार 120 चौरस फूट जमीन देण्यात आली.जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांच्या मुलीलाही 87 हजार 120 चौरस फूट जमीन देण्यात आलीय. तसेच मंत्र्यांच्या मुलानांही त्यांच्या खासगी कंपन्यासाठी जमीन दिल्याचं उघड झालं आहे.

नितीश कुमार यांचा या जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने केला आहे. विधानसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. अखेर दबावाखाली येऊन नितीशकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले.

close