पुणेकरांना पावसाने झोडपले तर पालिकेनं खड्यात घातले

July 20, 2011 12:21 PM0 commentsViews: 3

20 जुलै

गेले काही दिवस पावसाने पुणेकरांना हैराण केलं होतं. आणि आता पुणेकरांना सामना करावा लागतोय रस्त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांचा. पुण्याचे मुख्य शहर असो की उपनगर सर्वच ठिकाणी पुणेकरांना खड्‌ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागतोय. खड्डा चुकवताना वाहनांना आचके बसत आहे.

पण पुणेकरांचा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न वायाच जातोय. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची काम पूर्ण झालीत आणि यावर्षी पावसाळ्यात पुणेकरांना खड्डेमुक्त रस्त्यांवरुन जाता येईल असा दावा पुणे महानगरपालिकेने केला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे.

close