भारत आणि इंग्लंडदरम्यान शुक्रवारी पहिली वन डे

November 13, 2008 4:30 PM0 commentsViews: 7

13 नोव्हेंबर, राजकोटऑस्ट्रेलियाला हरवत भारतीय टीम आयसीसी टेस्ट क्रिकेट रँकींगमध्ये दोन नंबरवर पोहचली आहे. वन-डे रँकींगमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये फक्त तीन पॉईंट्सचा फरक आहे. इंग्लंड तिसर्‍या तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. पण आता भारत-इंग्लंड यांच्यातल्या सात मॅचच्या वन-डे सिरीजमध्ये हे चित्र बदलु शकतं. या मालिकेतली पहिली मॅच 14 नोव्हेंबरला राजकोटला होत आहे.2006मध्ये जेव्हा इंग्लंडनं भारताचा दौरा केला होता तेव्हा त्यांनी टेस्ट सीरिज ड्रॉ केली होती. पण वन डेमध्ये मात्र त्यांना 5-1 असा दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. आता आलेल्या इंग्लंड टीममध्ये 8 खेळाडू 2006च्याच टीममधले आहेत. पण या वेळेला त्यांचा कॅप्टन आहे केविन पीटरसन आणि या दौर्‍यासाठी ते सज्ज असल्याचा त्यांचा दावा आहे.झहीर खान आणि इशांत शर्मा ही भारताची वेगवान जोडी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडच्या टॉप ऑर्डर बॅट्समनची त्यांच्यासमोर खेळताना नक्कीच कसोटी लागणार. इंग्लंडचे बॉलर्स मात्र भारतीय खेळाडूंचा अभ्यास करुनच दौर्‍यावर आलेत आणि भारतीयांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी वेगळे डावपेचही आखले आहेत.पहिल्या तीन वनडे मध्ये सचिन तेंडुलकर खेळणार नसल्यामुळे इंग्लंडचे बॉलर्स तर नक्कीच सुखावले असतील. मात्र इंग्लंड टीममधला ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ मात्र तेंडुलकरशी दोन हात करायला उत्सुक आहे. तेंडुलकरचा सामना करायला त्यानं विशेष डावपेचंही आखले आहेत.आठवड्याभरापूर्वी स्टॅनफॉर्ड टी-20 स्पर्धेतला पराभव इंग्लंडच्या टीमला विसरावा लागणार आहे. पण साऊथ अफ्रिके विरूद्ध मिळवलेल्या 4-0 अशा विजयामुळे पीटरसन आणि त्याची टीम आत्मविश्वासानं या स्पर्धेत उतरतील. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे भारतीय टीमचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल, पण त्याचा टीम इंडियाला किती फायदा होतो, याचं उत्तर लवकरच मिळेल.

close