जळगावात खान्देश कामगार संघटनेविरूध्द गुन्हा दाखल

July 20, 2011 12:53 PM0 commentsViews: 7

20 जुलै

अन्न-धान्य आणि अनेक सरकारी सवलतीसाठी पिवळे कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. गरजू आणि कष्टकरी समाजातील ही मागणी नेहमीच असते. गरजूंची नेमकी ही गरज लक्षात घेऊन गरीब कष्टकर्‍यांना फसवणार्‍या खान्देश कामगार संघटनेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिवळे कार्ड देण्याच्या नावाखाली खान्देश कामगार संघटनेने अनेकांची फसवणूक केली. या प्रकारच्या कार्डसाठी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पैसे गोळा करण्याचे काम खान्देश कामगार संघटनेने केलं. प्रशासनाने या फसवणुकीची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी खान्देश कामगार संघटना पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करुन संघटनेच्या कार्यालातील दप्तर ताब्यात घेतले आहे.

close