दलवाईंच्या राज्यसभा निवडणुकीवर 12 आमदारांचा बहिष्कार

July 19, 2011 5:57 PM0 commentsViews:

19 जुलै

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग खडतर असल्याचे दिसतं आहे. अपक्ष आमदारांनी दलवाई यांच्या राज्यसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी ही घोषणा केली. सरकार अपक्ष आमदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांचा वापर केला जातो असा आरोप राणा यांनी केला. त्यामुळे दलवाई यांच्या राज्यसभा निवडणुकीत 12 अपक्ष आमदार मतदान करणार नाहीत असं राणा यांनी म्हंटलं आहे.

close