आरोपींना आश्रय देणार्‍या आमदार पुत्राला अटक

July 20, 2011 1:09 PM0 commentsViews: 6

20 जुलै

खूनप्रकरणातील आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मुलाला अटक करण्यात आली. राजेंद्र गावडे असं त्याचं नाव आहे. बाबू शेंडी या कुख्यात गुंडाचा एप्रिलमध्ये खून करण्यात आला होता. हा खून राजकीय कारणावरून आणि वाळूच्या ठेकेदारीवरून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. याप्रकरणी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली. तसेच या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी राजेंद्र गावडेसह आणखी दोघांना अटक करण्यात आली.

close