महापालिकांच्या कारभारावर अंकुश !

July 20, 2011 11:47 AM0 commentsViews: 4

20 जुलै

राज्य मंत्रिमंडळाने आज(बुधवारी) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिला म्हणजे खाजगी वाहतुकीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा आणि दुसरा महापालिकांमध्ये राज्यसेवेतील समकक्ष अधिकारी पाठवण्याचा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज पत्रकार परिषद घेऊन या निर्णायाची घोषणा केली.

पाणीपुरवठा, आरोग्यसेवा ढिसाळ कारभारावर त्यासाठी राज्य प्रशासकीय सेवेतले समकक्षी अधिकारी महापालिकांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठले जाणार आहेत. याबातचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहेत. या निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकार मोठ्या महापालिकांच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी मॅक्सिकॅब अर्थात वडाप वाहतुकीला अधिकृत करण्यास स्थगिती देऊन याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाची उपसमिती घेईल खाजगी वाहतुकीला परवाना देताना जे नोंदणीशुल्क असेल त्या नोंदणीशुल्काची रक्कम एसटी महामंडळाला देण्याचाही विचार राज्यसरकारने केला आहे. त्याबाबतचा निर्णय सुद्धा उपसमिती घेईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

close