सांगलीत चांदोली धरणाचे पाणी रस्त्यावर

July 20, 2011 12:11 PM0 commentsViews: 172

20 जुलै

सांगली जिल्हयातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. धरणक्षेत्रात पाण्याचा विसर्गही सुरूच आहे. चांदोली धरण 86 टक्के भरलं आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने 15 हजार क्यूसेक्स पाणी वारणा नदीत सोडण्यात आलं आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शिराळा तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहे. 15 गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे. तर कोयना धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहेत. सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पातळी 21 फुटांवर गेली आहे.

close