मुंबईत पावसाचं पाणी झिरपलं, अन् टाक्यात जाऊन मिसळलं

July 20, 2011 4:15 PM0 commentsViews: 3

20 जुलै

मुंबईतील मीरारोड पूर्वेकडच्या लक्ष्मी पार्क परिसरात जागोजागी पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी झिरपून जमिनीखालच्या टाक्यांमध्ये मिसळतं. त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होत आहे. याबाबत मीरा भाईंदर महानगर पालिकेकडे तक्रारी करुनसुद्धा पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

नैसर्गिक नाले बंद केल्याने अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पावसाळ्यात हे पाणी रस्त्यांवर येतं. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गटाराजवळून जात असल्याने काही ठिकाणी पाईपलाईन लिकेजमुळे गटाराचे पाणीही यात मिसळलं जात असल्याची तक्रार नागरिक करत आहे. तसेच इथं गटारे खोदून ठेवल्याने हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याने लोकांना घरात अडकून रहावं लागलं होतं.

close