भामट्याला चोप देणार्‍या शिवसेना कार्यकर्त्यावर अट्रॉसिटी दाखल

July 20, 2011 4:38 PM0 commentsViews: 2

20 जुलै

नोकरीचे बनावट आदेश देणार्‍या भामट्याला मारहाण करून त्याची धिंड काढल्या प्रकरणी हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बागर यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पुजाजी सदाशिव खंदारे यांच्यावर नोकरीचं आमिष दाखवून काही तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बागर व रिपाइचे मराठवाडा सरचिटणीस दिवाकर माने यांना हे कळल्यावर त्यांनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या कार्यकर्त्याना पाठवून खंदारे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला हिंगोलीत आणण्यात आले. कार्यकर्त्यांनी खंदारे याला भर रस्त्यावर मारहाण करत तोंडाला काळं फासलं आणि त्याची धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी संतोष बागर आणि इतर 10 जणांच्या विरोधात अट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

close