राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षाही अधिक कैदी

July 20, 2011 5:04 PM0 commentsViews: 6

विनय म्हात्रे, ठाणे

20 जुलै

राज्यातल्या महत्त्वाच्या जेलमध्ये क्षमतेपेक्षाही जास्त कैदी असल्याचे उघड झालं. कैद्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे त्यांना सोयीसुविधाही नीट मिळत नाही.

राज्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहेत. त्याबरोबरच कैद्यांची संख्याही वाढत आहे. राज्यातील काही प्रमुख जेलमधील स्थिती काय आहे. ठाणे जेलची क्षमता आहे 1105 कैद्यांची, पण आता तिथं एकूण 2487 कैदी आहेत. मुंबईतल्या आर्थर रोड जेलची क्षमता आहे 804, तर तिथं कैदी आहेत 1793.

पुण्याच्या येरवडा जेलची क्षमता आहे 2449, तर तिथं सध्या 3474 कैदी आहेत. या उलट परिस्थिती आहे नवी मुंबई इथल्या तळोजा जेलची याठिकाणी कैद्यांची क्षमता 2124 आहे. तर तिथं केवळ 620 कैदी आहेत. दहशतवादी आणि गँगस्टर यांच्यासाठी असलेल्या तळोजा जेलमध्ये सुरक्षा यंत्रणेबरोबरच कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला.

क्षमतेपेक्षा जास्त कैदी जेलमध्ये असताना आता त्यांच्यासाठी किती पोलीस उपलब्ध आहेत. ठाणे जेलमध्ये 400 पोलिसांची गरज आहे त्यापैकी 150 पदं मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात केवळ 70 पोलीस कामावर आहेत. 43 एकरावर असलेल्या जेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किंवा पोलिसांकडे वॉकीटॉकीही नाही. जेलमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी नाही, हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीत. ठाण्याप्रमाणेच राज्यातील सर्व जेलची ही परिस्थिती आहे.

या गोष्टींवर सरकारला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. सरकारने त्यावर फारशी पावलं उचलेली दिसत नाहीत. राज्यातल्या प्रमुख जेलची अशी स्थिती आहे. याबरोबरीने जिल्हा कारागृहाची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. वाढत्या कैद्यांमुळे कर्मचार्‍यांवरचा ताण वाढतोय. सरकार याकडं गांभीर्याने पाहत नसल्याचे आरो़प विरोधक करताहेत.

close