कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक

July 20, 2011 5:00 PM0 commentsViews: 5

20 जुलै

कोकण रेल्वेला सिंधुदुर्ग ते गोवा या मार्गावरही मेगा ब्लॉक घ्यावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी तळगावजवळ कोसळलेली दरड बाजूला केल्यानंतर आज पुन्हा एकदा तिथले धोकादायक खडक मशिनच्या साहाय्याने तोडून बाजूला करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची आडवली ते गोवा वाहतूक आज रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कोकण रेल्वेच्या मिरज मार्गे वळवण्यात येणार्‍या गाड्याही उशीराने धावणार आहेत.तसेच कोकण रेल्वेची वाहतूक 21 जुलैच्या दुपारनंतर सुरळीत होण्यासाठी रेल्वे यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. शनिवारी पोमेंडीला संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आता ट्रॅकवर येणारी डोंगराची माती काढण्यासाठी रेल्वेच्या 30 जेसीबी मशिन्स आणि 200 हून अधिक कामगार काम करत आहे.

close