भुजबळांनी डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ !

July 20, 2011 5:26 PM0 commentsViews: 5

20 जुलै

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जोरदार खडाजंगी झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागली. बॉम्बस्फोटांनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भुजबळ संतापले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले. हे आघाडीचे सरकार आहे तुम्ही समांतर सरकार चालवू नका असा इशारा भुजबळांनी दिला.

प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्री दुजाभाव करतात असा आरोप त्यांनी केला. राज्याचे अधिकारी महापालिकेत पाठवण्याच्या निर्णयाला भुजबळांनी विरोध केला. खासगी वाहतुकीच्या निर्णयावर भुजबळांनी केलेल्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाची उपसमिती नेमावी लागली. एमएमआरडीए आणि एमसीआरडीसीच्या वादावरूनही भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले.

close