पुण्यातला बी. व्ही.कारंथ नाट्यमहोत्सव

November 14, 2008 4:16 AM0 commentsViews: 9

14 नोव्हेंबर, पुणे प्राची कुलकर्णी पुणेकर नाट्यरसिकांना प्रसिद्ध कन्नड नाटककार बी. व्ही.कारंथ यांची गाजलेली नाटकं पाहण्याची संधी मिळणार आहे. ही संधी पुण्यातल्या ' समन्वय ' या नाट्यसंस्थेनं उपलब्ध करून दिलीय. 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव पार पडणार आहे.गेली काही वर्षं पुण्यामध्ये बादल सरकार,विजय तेंडुलकर अशा अनेक नाटककारांचे नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आलेत.आता समन्वय तर्फे कारंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. बी.व्ही.कारंथ यांना कर्नाटकातील प्रायोगिक रंगभूमीचे अर्धव्यू मानलं जातं.आपल्या वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण शैलीनं त्यांनी कन्नड रंगभूमीला नवचैतन्य दिलं आहे. त्यांनी दिग्दर्शीत केलेली 'हयवदन', 'जोकुरस्वामी' तसंच 'गोकुळ निगमना’ अशी अनेक नाटकं या महोत्सवात सादर करण्यात येणार आहेत. " 'बेन्नाक्का' नावाचा कारंथ सरांचा एक नाटकाचा ग्रूप होता. तिथे त्यांनी जी नाटकं बसवेलली होती ती तशीच्या तशी म्हणजे ओरिजनल संचातली नाटकं पुण्यातल्या नाट्यरसिकांपर्यंत पोहोचावीत ही आमची मनापासून इच्छा होती. या उद्देशाने पुण्यात बी. व्ही.कारंथ महोत्सव भरवला आहे. बी व्ही.कारंथांचं काम पुण्यातल्या रसिकांना पहायला मिळणारआहे," अशी माहिती 'समन्वय'च्या धर्मकीर्ती सुमंतने दिली. बी व्ही.कारंथ महोत्सवात कारंथांची नाटकं त्यांच्या मूळ संचात सादर केली जाणारच आहेत, पण त्याचबरोबरीने या महोत्सवाचा समारोप 'रंगकारंथ' या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमानं होणार आहे. 'रंगकारंथ'मध्ये कारंथांच्या नाट्यसंगीताचा आणि दिग्दर्शकीय वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे.

close